प्रेम अशक्य (Pyar Impossible) एक चित्रपट समीक्षा ;-)

pyaar impossible आज म्हणजे गुरुवार दिनांक १४ जानेवारी रोजी मी हा चित्रपट पहिला. आता हा चित्रपट पाहण्यास कारण काय असे तुम्ही विचारलं (काही लोक येडा झाला का राव!! ह्या टोकाच्या भूमिकेला जातील). पण हा चित्रपट पाहायचा असा चंगच बांधला होता, अहो जरा विचार करा कि उदय चोप्रा ह्या उत्कृष्ठ (हसू नका चांगला अभिनय म्हणजे काय हे त्याला माहित नाही हे लक्षात घ्या!!) अभिनेत्याचे चित्रपट हल्ली बघायला मिळत नाहीत हो!! म्हणजे मागच्या वेळी तो पडद्यावर दिसला होता तो म्हणजे ‘नील आणि निक्की‘ या भयपटातून (हश्या अन टाळ्या) .. आणि मी तो चित्रपट पाहू शकलो नव्हतो. त्यामुळे त्याची भरपाई करावी ह्या हेतूने मी हा चित्रपट पाहायचा चंग बांधला होता.. आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे जुगल हंसराज ने अहो असा दुग्ध शर्करा योग का रोज रोज येतो??

तर हा चित्रपट पाहायचे तर ठरवले परंतु सगळ्यात मोठी अडचण होती कि हा बघायला माझ्याबरोबर येणार कोण? सगळेजण माझ्यासारखे चित्रपट प्रेमी  नाहीत हो! शेवटी एक मित्र तयार झाला परंतु एका अटीवर चित्रपटाचा संपूर्ण खर्च हा मी करायचा (त्याला फालतू गोष्टीवर पैसे खर्च करणे आवडत नाही म्हणे !).. बर मग हा चित्रपट बंगलोर मध्ये बघणार म्हणजे फक्त multiplex मधेच पाहावा लागणार!!!  आता हे काय स्वस्तात पडणार नाही  हे ध्यानात आल्यावर आपला मामा होणार असे वाटले परंतु शक्कल लढवून हा चित्रपट गुरुवारी सकाळी म्हणजे  Morning show + non weekend =70/- ओन्ली मग जीवात जीव आला.. अश्या रीतीने सर्व काही यथासांग पार पडले आणि आम्ही चित्रपट पाहण्यास गेलो !

चित्रपटामध्ये बघण्यासारखी एकाच गोष्ट होती ती म्हणजे प्रियांका चोप्रा ( a die hard fan you know !!). चित्रपट अपेक्षे पेक्षा चांगला होता (हा हा हा हा हा !!). हा चित्रपट लोकांनी डोकं घरी ठेऊन बघायला जावे हि कळकळीची विनंती. (आणि माझ्या मित्र प्रमाणे दूरदृष्टीचे असाल तर स्वतः ticket काढणे शक्यतो टाळा) .. ह्या चित्रपटातील चुका काढणे शक्यतो आवरा (खासकरून जे संगणक अभियंते भावंडे आहेत त्यांनी तरी!!)..

ह्या चित्रपटातील दोन गोष्टी ठळक पाने आठवतील
१) बालकलाकार तान्या (जरा जास्तींच परिपक्व अभिनेत्री आहे(वय वर्ष ६) पण खूपच cute आहे!)
२) चित्रपटात एक हृदयद्रावक (दिग्दर्शकाच्या मते) प्रसंगानंतर – जेंव्हा प्रियांका अपने प्यार का इजहार करती है – तेंव्हा एका उडानटपु पोरांनी मागच्या रांगेतून वाजवलेल्या टाळ्या आणि ते ऐकून प्रेक्षकात पिकलेला हश्या !!!! (आणि हो multiplex मध्ये सुधा ‘मागची रांग’ असते !! )

तर असा होता हा चित्रपट!!!! (चित्रपटाबद्दल काय बोलायचं अजून?? हा प्रश्न न सुटल्यामुळे लेखणी इथेच थांबवतो!)

आपण कोणी नावाजलेला किंवा पोहचलेला समिक्षाकार नाहीये आणि ती कश्याबरोबर खातात किंवा करतात ह्याच्या चुकून सुद्धा वाट्याला न जाणारा साधा स्वयंभू उनाडका लेखक आहे !!

ता.क. – जर कुणाला ही समीक्षा आवडली नसेल तर कृपया पामराला क्षमा करा .. अगदी साष्टांग सुद्धा घालायला तयार आहे पण उगीच राग धरू नका !!!

पौराणिक मालिका आणि त्यातले राक्षस

रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिका जेंव्हा दूरदर्शनवर यायच्या तेंव्हा आम्ही त्यातल्या राक्षस किंवा असुर (जे racism म्हंटले जाणार नही ते) या मंडळीना खूप खूप घाबरायचो. आता ते का घाबरायचो त्याचा महत्वाचं कारण म्हणजे एक तर ते बरेच स्थूल होते व त्यांचा वर्ण हा नेहमी कृष्ण पक्षाकडे झुकलेला असायचा.. त्यांचे दात मात्र पांढरे शुभ्र होते .. (अजून ही असावेत )

तर त्यांची आठवण यायचे कारण म्हणजे आज जेंव्हा ह्या मालिका पाहतो त्यावेळी वाटतं कि खर तर राक्षस किंवा दानव किंवा असुर ही खंर तर फार सुखी आणि समाधानी मंडळी होती . म्हणजे दुसर्यांना त्रास द्यायची पण तशी फार खुश असायची …

१) सबंद वेळ सारे असुर हसायचे .. (हसणे म्हणजे आनंदी वातावरण .. आज काल म्हातारी लोक हसायचा club काढतात ) .. आणि फक्त चांगल्याच नही .. तर वाईट वेळात सुद्धा हसायची .. (अगदी देव मारायला आला तरी .. “हा हा हा हा हा .. तू मुझे मारेगा!!!”). अशी सुखी प्राणीमात्रे कुठे सापडतील सांगा ??

२) हे लोक कश्याची म्हणजे कश्याचीही काळजी करत नसत… लोक काय म्हणतील? देव मारतील काही काही म्हणून चिंता नही ..

३) हे लोक घाबरत ही नसत .. अगदी जीव तोंडात आला तरी खुशाल हसत हसत पुढच्याला खिजवीत असत.

तर आज जेंव्हा ह्या मंडळीना पाहतो तर वाटतं कि वाह काय लाईफ स्टाइल आहे … !!! आता आपण त्या असुरांना घाबरत नाही तर त्यांना रोल मोडेल मानतो .. (फक्त वाईट भाग सोडून 😉 )…

Tagged ,

मी, नववर्ष आणि नवं संकल्प!!!

नववर्ष्याचे संकल्प हे मोडण्यासाठीच असतात असं कुणी करी म्हटलंय.. आता नक्की आठवत नाही कोण म्हणालं ते, पण ते महत्वाचं नाही, म्हणणं महत्वाचं आहे. तर आज त्या विचाराची आठवण येण्याच कारण म्हणजे सालाबाद प्रमाणे मी यंदाही काही संकल्प योजले आहेत. आणि सालाबाद प्रमाणे ते मी मोडीनच .. आता संकल्प करण्याचा आणि मोडण्याचा इतका सराव झालाय कि एक pro च झालोय म्हणा ना. पण इतके संकल्प मोडूनही आपण संकल्प करण्याचा चंग काही सोडला नाही (चिकाटी अंगात फार हो) आणि सोडणार ही नाही (हा एकच संकल्प आपण मोडला नाही).
तर यावर्षी मी बरेच संकल्प केलेले आहेत. यातले बरेच पहिल्या ३-४ दिवसातच मोडले गेले (जिद्द फार). राहिलेल………. तर सदर संकल्प खाली लिहितोय.

१) वजन ६० किलो करणे (हे मात्र वर्षाच्या शेवट पर्यंत राहील कारण तोपर्यंत जिद्द राहील हो अंगात)
२) आठवड्यातून २ ब्लॉग्स लिहिणे (आज पर्यंत एक चिटोरा लिहिला नाही .. अगदी प्रेमपत्र सुद्धा .(कोणी भेटलेच नाही – द्राक्षे आंबट पण नाहीत आणि कडू पण उगाच कुजके हसू नका))
३) रोज एका मित्राला फोन करणे (साले सगळे शिव्या मारतात .. आता बघतो एक एकाला)
४) रोज jogging करणे  (तसं मी पळतो हो पण १०-२० मीटर पळालो कि दम लागतो)
५) वायफळ खर्च थांबवणे (म्हणजे  मोबाईल, PSP, XBOX असल्या वायफळ गोष्टी घेणे थांबवणे)
६) घरी नित्यानेयमाने फोन करणे (तात आणि मातोश्री खूप काळजी करतात हो .. अधून मधून शालू बाजूला ठेवून जोडे पण मारतात – आठवण येत नाही आता आमची .. कमावते झालात ना वगैरे वगैरे )

तर ही बरीच संक्षिप्त सूची होती.. अजून बरेच items राहिले आहेत अजेंडा वरचे पण ते शालू आड राहिलेले बरे .. !!!

सूचना – हे आमचं साहित्य क्षेत्रातले पहिले पाऊल आहे .. तर जर मात्तब्बर वाचकवर्गाला जर काही सूचना कराव्याश्या वाटल्या तर आपण काही तमा न बाळगता करून टाका.

Tagged ,